
सिंधुदुर्ग सावंतवाडीआंबेगाव येथे शुक्रवारी पहाटे तीन इसम गावठी बॉम्ब पेरताना आढळले
सिंधुदुर्ग सावंतवाडी आंबेगाव येथे शुक्रवारी पहाटे तीन इसम गावठी बॉम्ब पेरताना आढळून आले. या तिघांना त्यांच्याकडील गावठी बॉम्ब व त्यांच्या ताब्यातील दुचाकींसह जेर बंद करण्यात आले. या तिघांनाही येथील न्यायालयात हजर केले असता तिघांनाही शनिवार पर्यंत वन कोठडी सोडवण्यात आली.आंबेगाव येथे असलेल्या वन सर्वे क्रमांक ८१ मध्ये तीन इसम गावठी बॉम्ब पेरणी करीत असल्याचे वन विभागाच्या भरारी पथकास निदर्शनास आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकजण फरार होण्याच्या उद्देशाने पळू लागला. त्याचा पाठलाग करून वनविभागाच्या गस्ती पथकाने त्याला व अन्य दोघांनाही ताब्यात घेतले. अबीर प्रकाश आंगचेकर (३०, रा. सांगेली, खालचीवाडी), चंद्रकांत शंकर दळवी ( ५० रा.आंबेगाव म्हारकटेवाडी) व शांताराम गोपाळ राऊळ ( ४६, रा.सांगेली टेंबकरवाडी) अशी त्यांची नावे आहेत.www.konkantoday.com