
सततच्या पावसामुळे चौपदरीकरणाच्या कामात अडचणी
खेड जवळील भरणे परिसरातील चौपदरीकरणाच्या कामासाठी सपाटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. जगबुडी पुलानजिक संरक्षक भिंत उभारण्याचे काामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सपाटीकरणाच्या कामात अडचणी येत आहेत याचमुळे भरणे जंक्शनवर भुयारी मार्ग खोदण्याचे कामदेखील लांबणीवर पडले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या ४४ कि.मी. अंतरापैकी २२ कि.मी. अंतरावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
www.konkantoday.com