शेतात कामाला गेलेल्या महिलेला सर्पदंश
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील महिलेला फुरसे चावल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. द्रुपदी दौलत बाऊल (३०, रा. बाऊलवाडी, दाभोळे) असे महिलेचे नाव आहे. महिला मतदान करून घरी आल्यानंतर शेतात सुकण्यासाठी टाकलेले भिजलेले भात उलटण्यासाठी गेली होती. भाताचा पेंढा उलटत असताना तिला फुरसे चावले.
www.konkantoday.com