
चिपळूण तालुक्यात शिवसेना पदाधिकार्यांच्या नेमणुका
चिपळूण : शिवसेनेने चिपळुणात शिवसेना पदाधिकार्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून तालुकाप्रमुखपदी माजी जि. प. सदस्य विनोद झगडे यांची नियुक्ती झाली आहे तर माजी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांना बढती मिळाली असून त्यांना चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुखपद मिळाले आहे. माजी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांना विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुका समन्वयक म्हणून माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांना नव्याने पद देण्यात आले आहे.