रिफायनरी प्रकल्प पुन्हा गुहागरमध्ये आणावा- प्रशांत जोशी
गुहागरमधून रद्द करून रायगडमध्ये होऊ घातलेला नाणार प्रकल्प पुन्हा गुहागरमध्ये आणावा व कोकणातील रोजगार, व्यापार वृद्धिंगत करावा, त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करावा अशी विनंती चिपळूण येथे उद्योजक प्रशांत उर्फ राजू जोशी यांनी केली. तसेच त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य लोटेतील उद्योजक शासन व महामंडळाला करतील अशी ग्वाही श्री. जोशी यांनी दिली.
www.konkantoday
com