मूकबधिर विद्यालयात दिवाळीनिमित्त मुलांनी बनवलेल्या वस्तूंच्या  प्रदर्शनाचे उद्घाटन  संपन्न

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दिवाळीनिमित्त खास बनवलेल्या विविध शोभिवंत वस्तूंच्या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक प्रवीण मलुष्टे यांनी केले. शाळेतील मुलांची कलाकुसर पाहून ते भारावून गेले.
श्री. मलुष्टे यांनी शाळेची पाहणी करून मुलांचे कौतुक केले. मूकबधिर असूनही या मुलांची आकलनशक्ती हस्तकला कौशल्य वाखाणण्याजोगे आहे, असे सांगितले. या वेळी कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुमिता भावे, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, सौ. प्रभुदेसाई, संस्थेच्या सीईओ सुमित्रा बोडस, व्यवस्थापक शेखर लेले, मुख्याध्यापक गजानन रजपूत, माजी मुख्याध्यापक अरुण फाटक आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये आकाशकंदील, मातीच्या पणत्या, मातीपासून बनवलेले मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, लाकडी वस्तू, कापडी पिशव्या, कलाकुसर, सजावट केलेल्या वस्तू, शो पीस आदींची सुरेख मांडणी केली आहे. विद्यार्थ्यांनी कार्टून्सची शुभेच्छापत्रे, पारंपरिक आकाश कंदील, टाकाऊ लाकडापासून बनवलेले पेपरवेट, पेन स्टँड, करवंटीच्या शोभिवंत वस्तू, लाकडी बैलगाडी, शोभिवंत वस्तू, विविध मसाले, कापडी पिशव्या, दुपटी झबली-टोपरी, सजावटीचे साहित्य अप्रतिम आहे. गाडीतळ येथील शाळेच्या सभागृहात प्रदर्शन ते 25 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत खुले राहणार आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी प्रदर्शनाला भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button