
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या सावंतवाडी-दिवातून महिलेचे ७५ हजाराचे दागिने लंपास.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या सावंतवाडी-दिवा गाडीतून प्रवास करणार्या एका महिलेचे ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत दापोली येथील एका महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
त्या १९ डिसेंबर रोजी दुपारी ३.१० ते ४ च्या मुदतीत सावंतवाडी-दिवा गाडीत चढल्यानंतर गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने त्याच्या हातातील ७५ हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लंपास करत पोबारा केला. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com