
जाकादेवीत प्रौढाला मारहाण करून चेन पळवली
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी लगत असलेल्या नरबे दत्तमंदिर येथे अज्ञाताकडून प्रौढाला मारहाण करण्यात आली. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंद गुणाजी किंजळे (५५, रा. देवूड चाटवळवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. किंजळे हे जाकादेवी येथे मुलासोबत आले होते. मुलाच्या पाठिमागून ते काही अंतरावून चालत येत असताना अज्ञात इसम त्यांना फूस लावून नरबे येथे घेवून गेला. या ठिकाणी या इसमाने त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील चेन चोरून नेली. अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
www.konkantoday
com