चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी-चिपळूणमध्ये स्वरदीपोत्सव मैफल
चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने यावर्षी चिपळूण आणि रत्नागिरीत स्वरदीपोत्सव या पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलित मंजुषाताई यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनासह भक्ती-अभंग- उपशास्त्रीय गायनासह भक्ती-अभंग- नाट्यसंगीत अशी संमिश्र गान संगीताची मेजवानी कोकणातील रसिकश्रोत्यांना मिळणार आहे.
दिवाळी पहाट या उपक्रमाचे मूळ संकल्पक (पायोनियर) असलेल्या चतुरंगने गेल्या ३३ वर्षात मुंबई, ठाणे, चिपळूण, वहाळ, गुणदे, गोवा असा प्रवास करत सुमारे ४० च्या आसपास दिवाळी पहाट दीपस्तंभ साकार केल्या आहेत. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ ते ९ या वेळेत जयेश मंगलपार्क, थिबापॅलेस रोड रत्नागिरी येथे तर ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ६ ते स. ९ या वेळेत माऊली बँक्वेट हॉल, कावीळतळी, चिपळूण येथे पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मैफलीच्या प्रवेशिका रत्नागिरीत हॉटेल खवय्ये (टिळकआळी), कॅरम कॅफे (जयस्तंभ), हॉटेल गोपाळ (मारूती मंदिर) येथे तर चिपळूणमध्ये २५ पासून काणे बंधू हॉटेल (चिंचनाका), चतुरंग कार्यालय (बुरूमतळी), समर्थ पेपर्स (काविळतळी) येथे मिळतील.
www.konkantoday.com