कोट्यवधी रुपयांच्या सुक्या मासळीचे पावसामुळे नुकसान
रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून पडणार्या परतीच्या पावसामुळे उन्हात वाळत टाकलेली मासळी भिजली आहे. त्यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि उरण या चार तालुक्यांमध्ये ४३ मासेमारी बंदरांच्या परिसरात सुक्या मासळीची केंद्रे आहेत. त्याना परतीच्या पावसाचा तडाखा बसला असून वाळत ठेवलेली पापलेट, बोंबील, सुरमई, मांदेली, बांगडा आदी प्रकारची मासळी भिजली आहे.रत्नागिरी जिल्हय़ासह कोकणात मोठय़ा प्रमाणावर या भागातून सुकी मासळी येते यामुळे आगामी काळात खवय्यांना याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे .
www.konkantoday.com