
विमान दुर्घटनेतील मृतांनानरेंद्राचार्यजींची श्रद्धांजली
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी विमान दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की,” गुरुवारी अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या विमान दुर्घटनेमुळे अंतःकरण हेलावले. या भीषण अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली. तसेच त्यांच्या कुटुंबाप्रती मन:पूर्वक सहवेदना. ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो!”