सिंधुदुर्गात शांततेत मतदान पार,अंदाजे 63.55 टक्के मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तीन मतदारसंघात 3 लाख 33 हजार 740 पुरूष मतदार आणि 3 लाख 36 हजार 843 स्त्री मतदार असे एकूण 6 लाख 70 हजार 583 मतदारांमधून अंदाजे 63.55 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. कणकवली मतदारसंघात 1 लाख 12 हजार 867 पुरूष मतदार आणि 1 लाख 17 हजार 157 स्त्री मतदार आहेत. या मतदारसंघात अंदाजे 62.59 टक्के, कुडाळ मतदारसंघात 1 लाख 7 हजार 266 पुरूष मतदार आणि 1 लाख 8 हजार 574 स्त्री मतदार आहे. या मतदारसंघात 63.58 टक्के अंदाजे मतदान झाले तर सावंतवाडी मतदारसंघात 1 लाख 13 हजार 607 पुरूष मतदार आणि 1 लाख 11 हजार 112 स्त्री मतदार आहे. या मतदारसंघात अंदाजे 64.58 टक्के मतदान झाल्याचे डॉ.पांढरपट्टे यांनी सांगितले.
www.konkantoday.com