शहीद पोलिसांना श्रद्धांजली कार्यक्रम
लडाखमधील हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शुर शिपायांवर दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजीफ चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व सरहद्दीचे रक्षण करताना प्राणार्पण केले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी भारतभर पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येतो.
दिनांक 01/09/2018 ते 31/08/2019 या कालावधीत भारतामध्ये एकुण 292 पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले व शहीद झाले. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व जवानांनी कर्तव्य बजावत असताना प्राणार्पण केले. कर्तव्य बजावीत असताना प्राणार्पण केलेल्या देशातील सर्व हुतात्म्यांना दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी पोलीस मुख्यालय परेड मैदानावर मा.श्री.सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी व मा.डॉ.प्रविण मुंढे, पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सदर श्रध्दांजली कार्यक्रमास मा.श्री.सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी, पोलीस अधीक्षक, डॉ.प्रविण मुंढे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री.अय्युब खान, पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोलीस निरीक्षक श्री.सुरेश कदम, पोलीस निरीक्षक श्री.हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक श्री.अनिल लाड, राखीव पोलीस निरीक्षक श्री.रामदास पालशेतकर यांचेसह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
www.konkantoday.com