
नागरिकांना लस मोफत द्यावी या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई योग्य नाही,नबाब मलिक यांच्या घोषणेवर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात नाराज
लसीकरणाबाबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी, नागरिकांना लस मोफत दिली गेली पाहिजे असा आग्रह धरला आहे. मोफत लस द्यावी अशी मागणी आम्हीदेखील मुख्यमंत्र्यांकडे करतो आहोत. पण मुख्यमंत्री याबद्दल विचार करत असताना केवळ श्रेय घेण्यासाठी जर कोणी काही जाहीर करत असेल, तर ते आम्हाला आवडलेलं नाही”, अशा स्पष्ट शब्दात बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. “नागरिकांना लस मोफत द्यावी या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला पाहिजे. त्यामुळे याबाबत चर्चा सुरू असताना श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही”, असंही ते म्हणाले.
www.konkantoday.com