
मतदानाच्या दिवशी रक्तदान,लाइफलाइन फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
मतदानाच्या दिवशी रक्तदान अशी अभिनव संकल्पना,कोकणातील अग्रणी युवक स्वयंसेवी संस्था असलेल्या लाईफलाईन फाऊंडेशन च्या वतीने राबवण्यात आली.त्या प्रसंगी लाईफ लाईन फाऊंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.हृषिकेश केळकर,खजिनदार Adv.अनिश पटवर्धन,उपाध्यक्ष गौरव शेठ संसारे,सल्लागार समिती चे प्रमुख मनोर शेठ दळी युवा उद्योजक व लाईफ लाईन चे आधारस्तंभ माधव शेठ पोतकर,संदेश भाई सावंत सह-सचिव सौरभ मेहता ,Advt.अक्षय कंगुटकर,सोपान गुरव,अमित जाधव, युवा उद्योजक अक्षय शेठ पोवार,युवा उद्योजक निलांकन देवळकर ,तसेच जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.आरोग्य,पर्यावरण संवर्धन व विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या लाईफ लाईन फाऊंडेशन च्या वतीने ५० पेक्षा अधिक रक्तदान शिबिरं,आरोग्य शिबिरं, पर्यावरण संवर्धनासाठी ,विविध उपक्रम,मतिमंद मुलांसाठी उपक्रम,जनजागृती कार्यक्रम तसेच विविध आपत्तीच्या प्रसंगात ‘हेल्प बॉक्स’ उपक्रम राबवून मदत करण्यात आली आहे. ब्लड ऑन कॉल उपक्रम अंतर्गत लाईफलाईन फाऊंडेशन तर्फे गरजू रुग्णांना असेल त्या जिल्ह्यात असेल त्या रुग्णालयात मदत उपलब्ध करुन दिली जाते.
www.konkantoday.com