फुणगूस खाडी भागात आजही पावसाने झोडपले ,सर्वत्र पाणी

(एजाज पटेल )फुणगस खाडीभागाला आज तिसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले आहे
सकाळपासून पावसाचे काळोखी वातावरण होते . दुपारी तीन नंतर विजांच्या कडकडाटासह फुणगूस परिसराला अक्षरशः झोडपले.
धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी ,मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी जमा झाल्याने व रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता की पाण्याचा ओढा अशी परिस्थिती निर्माण झालीं हाेती.
रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत हाेती.
पावसाच्या अगमना बरोबरच विजेनेही दडी मारली .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button