
निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग, २० जणांविरूद्ध तक्रार दाखल
खेड येथील अपक्ष उमेदवार सौ. सुवर्णा पाटील यांचे प्रतिनिधी श्री. रमेश भुवड यांनी भालचंद्र बेलोसे व अन्य १९ जणांविरूद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. यातील भालचंद्र बेलोसे व अन्य १९ जणांनी कुणबी समाज बांधवांनी स्वार्थी व ढोंगी पुढार्यापासून सावधान असे पत्रक छापले व प्रसिद्ध केले. या पत्रकाराच्या शीर्षकामुळे व लेखामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्ये भ्रष्ट आचरण करून जातीय तेढ निर्माण होईल अशी कृती करून आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com