चिपळुणात ऑनलाईन फसवणूक
बसचे रिझर्व्हेशन करून देतो असे सांगून दिलेल्या वेबसाईटवर माहिती भरल्यानंतर यातून एकाची २९ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी गणेशलाल खेमराज जैन (४६, मूळ राजस्थान, सध्या वालोपे) यांनी दिली. जैन यांचा १८ ऑक्टोबर रोजी सायं. ७ वा. पार्श्वनाथ ट्रॅव्हल्स प्रा. लि. अहमदाबाद असे फोनवरून हिंदी भाषेत अज्ञाताने सांगितले. राजस्थानमध्ये जाण्यासाठी बसचे रिझर्व्हेशन करून देतो, असे जैन यांना सांगितले. अज्ञाताने दिलेल्या वेबसाईटवर जैन यांनी ती ओपन करून त्यावर माहिती भरून पाठवली. मात्र त्या अज्ञाताने जैन यांचे ट्रॅव्हलर्स बुकिंग करून न देता त्यांनी पाठवलेल्या माहितीचा गैरवापर करून बँक ऑफ बडोद्याच्या चिपळूण शाखेत असलेल्या फिर्यादीच्या अकांटवरून २९,९९९ रुपये काढून फसवणूक केली.
www.konkantoday.com