
कोकण मार्गावर फलाटांचा तिढा सुटणार.
कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकातील फलाटांचा (प्लॅटफॉर्म) तिढा लवकरच सुटणार आहे. स्थानकातील फलाट पुरेशा उंचीचे असणे आवश्यक असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला बजावले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचे भान ठेवा, असे निर्देश देत रत्नागिरी-भोके स्थानकानजिक फलाट पुरेशा उंचीचे बनवण्याबाबत दोन महिन्यात अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांतील कमी उंचीच्या फलाटांमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. भोके रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी असते. यामुळे रेल्वे प्रशासनाला अत्यल्प उत्पन्न मिळत असल्यामुळे रेल्वे प्रशासन फलाटांचा प्रश्न सोडवत नसल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. www.konkantoday.com