सुभेदार भालचंद्र झोरे यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप
हरचेरी गावचे सुपुत्र शहीद जवान सुबेदार भालचंद्र रामचंद्र झोरे यांच्या वर त्यांच्या हरचेरी रत्नागिरी या मुळ गावी शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आमदार उदय सामंत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी अधिकारी व ग्रामस्थांनी आदरांजली अर्पण केली.रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी येथील भालचंद्र रामचंद्र झोरे हे जवान इलाहाबाद येथे कामगिरीवर असताना त्यांचे निधन झाले होते .शहीद झोरे यांचे मूळ गाव हरचेरी असून, सध्या पुणे येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यासाठी होते.
www.konkantoday.com