लोटिस्माचा अपरांत भूषण पुरस्कार डॉ. वसंतराव शिंदे यांना जाहीर
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद तथा अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा “अपरांत भूषण” पुरस्कार नामवंत पुरातत्व संशोधक डॉ वसंतराव शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरातत्त्व संशोधनात जागतिक कीर्ती मिळवलेल्या डेक्कन अभिमत विद्यापीठाचे डॉ. वसंतराव शिंदे हे माजी कुलगुरू आहेत चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावी त्यांचा जन्म झाला. पुरातत्त्व संशोधन क्षेत्रात त्यांनी अनेक संशोधने केली आहेत याशिवाय नऊ संशोधनात्मक पुस्तके लिहिली आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिका मध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अलौकिक कार्याची अभिमानपूर्वक दखल घेऊन लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या निवड समितीने अपरांत भूषण पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड केली आहे. १७नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे .
www.konkantoday.com