
रेल्वे स्थानके झाली स्वच्छ !
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कोकण रेल्वेकडून मोहीम राबविली गेल्याने रेल्वे स्थानके तसेच स्थानकांचा परिसर स्वच्छ दिसू लागला आहे. रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांनी गाड्यांमध्ये खाद्य पदार्थांचे रॅपर तसेच प्लास्टीक पिशव्या फेकू नयेत, यासाठी कापडी पिशव्या वापरण्यासाठी प्रवाशांना प्रवृत्त केले जात आहे. कोकण रेल्वेकडून पर्यावरण जागृतीसाठी प्रवाशांना कापडी पिशव्या वाटपाची मोहीम देखील हाती घेतली आहे.
www.konkantoday.com