रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा,नेमबाज पुष्कराज इंगवलेला “रौप्य पदक”
रायफल नेमबाजीत नावाजलेला रत्नागिरीचा सुपुत्र पुष्कराज जगदीश इंगवले ह्यांनी पुन्हा एकदा गौरवास्पद कामगिरी केली आहे, नुकत्याच पार पडलेल्या महारात्रातील सर्वोच समजल्या जाणाऱ्या ३६ व्या महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धेत पुष्कराज ह्यांनी ६०० पैकी ५८७ गुण संपादित करतं द्वितीय स्थान पटकावले.
ही स्पर्धा वरळी, मुंबई येथे १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली होती त्या मध्ये ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत पुष्कराज ह्यांनी सहभाग घेतला, प्रथम स्थान इंडियन कस्टम्सच्या इंद्रजित मोहिते ह्यांनी पटकावले तर तृतीय स्थान भारतीय रेल्वेच्या विश्वजीत शिंदे(शिवछत्रपती पुरस्कार विजेते) ह्यांनी पटकावले.
www.konkantoday.com