जिल्हा रुग्णालयात वर्षभरात विविध प्रकारच्या २७६९ शस्त्रक्रिया

सर्वसामान्य लोकांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या एक वर्षाच्या काळात २७६९शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या .मोठ्या शहरात होणाऱ्या तसेच खाजगी रुग्णालयात होणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता शासकीय रुग्णालयात होत आहेत.वर्षभरात झालेल्या एकूण शस्त्रक्रियांपैकी १११५अवघड शस्त्रक्रिया या रुग्णालयात करण्यात आल्या तर डोळ्यांच्या ७३६शस्त्रक्रिया झाल्या. शासकीय रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱयांबरोबरच कोल्हापूर रत्नागिरी येथून येणारे स्पेशल डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी मदत करीत आहेत. यामुळे सर्वसामान्य व ग्रामीण भागातील गरीब रुग्णांचे हजारो रुपये वाचले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button