
पीर बाबरशेख उरूसानिमित्त मोफत ब्रेक डाऊन कॅम्प
रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशनचा उपक्रम
रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन तर्फे सालाबादप्रमाणे हातिस येथील पीर बाबर शेख उरूसा निमित्त दुचाकी (टू-व्हीलर) मोफत ब्रेक डाऊन सर्व्हिस कॅम्प कॅम्प व पंक्चर सेवा आयोजित करण्यात आली आहे .
हातिस येथील पीर बाबर शेख दर्गा (पाठीमागील भाग कमानीतून पार्किंग च्या ठिकाणी ) व टेंभ्येपूल (चौक) येथे कॅम्प आयोजित केला आहे .
रत्नागिरी शहरापासून दूर व दुर्गम भाग असलेल्या हातिस गावात उरूसानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होत असते . दिवस -रात्र वाहनांची वर्दळ सुरू असते . रात्री जर गाडी बंद पडली किंवा पंक्चर झाली तर कुटुबियां समवेत आलेल्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन तर्फे गेली चौदा (14) वर्षे विनामूल्य सेवा सुरू आहे .
उरुसाच्या संध्याकाळ पासून म्हणजे (8 -फेब्रुवारी ,शनिवार सायंकाळी 5 वाजल्यापासून) दुसर्या दिवशी (9- फेब्रुवारी रविवार सकाळी 7 वाजेपर्यंत) ही सेवा दोन्ही ठिकाणी दिली जाईल . अरूंद मार्गामुळे बहुतांश वेळा वाहतूक कोंडी होत असते अशा वेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस बंधू ना मेकॅनिक असोसिएशन चे सदस्य सहकार्य नेहमी करत असतात.
भाविकांच्या दुचाकी गाडीत काही बिघाड झाल्यास अथवा दुचाकी गाडी पंक्चर झाल्यास खालील ठिकाणी किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा .
कॅम्प क्रमांक -1
हातिस दर्गा पाठी मागील (पार्किंग भाग) (कमानी जवळ) हेल्पलाईन नंबर
1) मोहसीन वणू :- 8087011781/ 9420272428/ 7249646060
2)महेश गोताड :- 9975550763
3)चंद्रकांत (दादा) पेठे :- 9767909976 /8857095740
4)महेश पालकर :- 9404763511 / 9370859343
5) मशाक कुरणे :- 7066240855
6) गणपत वेदरे :- 9423294577 / 7796325622
टेंभ्येपूल (चौक) कॅम्प क्रमांक -2
हेल्पलाईन नंबर
1) अल्लाउद्दीन पटवारी :- 9028718681 / 766784083
2) दिनेश धनावडे :- 8975967503 / 9834784209
3) प्रमोद (बावा) शिवलकर :- 9860026599
4) कल्पेश मेस्त्री :- 9860939755
5) प्रथमेश पावसकर :- 9623130240
कोणालाही आपल्या दुचाकी बद्दल उरूसा च्या रात्री काहीही अडचण असल्यास आमच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आपण आपले दुचाकी वाहन घेऊन उरूसाला
पण दुचाकी वाहन चालवताना काळजी, सावधगिरी ,शिस्त व वाहतुकीचे नियम पाळा .
आपल्या पोलीस भगिनी व पोलीस बंधु यांना सहकार्य करा
रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन
गेली कित्येक वर्षे सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली एकमेव संस्था आहे
www.konkantoday.com