देवेंद्र फडणवीस दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांचे योगदान-अॅड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत या एकाच ध्येयाने प्रेरीत झालेले भाजपचे मतदार महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी योगदान देतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
अॅड. पटवर्धन म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भाजपचा जनाधार वाढला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीत झालेल्या प्रचंड महासभेमुळे महाजनादेश भाजपच्या मागे असल्याचे अधोरेखित झाले. संपूर्ण जिल्ह्याचा मागोवा घेता भाजपची वाढलेली ताकद ही सहज लक्षात येते. भाजपचा हा वाढीव जनाधार महायुतीच्या उमेदवारांना लाभदायक ठरणार आहे. भाजपने सर्व मतदारसंघामध्ये बूथ समित्या, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व अन्य पदाधिकारी अशी रचना केली होती. ही सर्व रचना या निवडणुकीच्या कामी कार्यरत झाली आहे. याचा आणि संघटनात्मक रचनेचा, कौशल्याचा लाभ सेनेच्या उमेदवारांना मिळेल.
*महायुतीची सत्ता*
अॅड. पटवर्धन यांनी सांगितले की, विधानसभेमध्ये बहुमताने भाजप महायुतीची सत्ता स्थापन करेल. देवेंद्र फडणवीस दुसर्यांचा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. हे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते शिवसेना व उमेदवारांबद्दलचा रोष, नाराजी विसरून धडाडीने कामाला लागले आहेत, याचे प्रत्यंतर निवडणुकीत येईल. संपूर्ण प्रचारयंत्रणेत भाजपचे जिल्हा, तालुका व बूथस्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, विविध आघाडीप्रमुख कार्यरत आहेत.
*एकसंध फळी प्रचारात*
भाजपची एकसंध फळी प्रचारकार्यात सक्रिय झाली आहे. यामध्ये विशेष करून सचिन वहाळकर, अशोक मयेकर, प्रशांत शिरगावकर, नीलम गोंधळी, तुषार खेतल, प्रशांत डिंगणकर, प्रमोद अधटराव, सतीश मोरे, नीलेश सुर्वे, विनोद चाळके, बाबा परुळेकर, विलास पाटणे, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, वैशाली निमकर, सुरेखा खेराडे, मृणाल शेट्ये, अभिजित गुरव, श्री. वाकडे आदी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात अग्रेसर आहेत, असेही अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.