कोल्हापुरात स्फोट झाल्याने ट्रक चालकाचा मृत्यू
शाहू टोल नाक्यानजीक उड्डाणपुलाखाली अज्ञात वस्तूचा शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास स्फोट झाला. त्यात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. दत्तात्रय गणपती पाटील (वय 56, न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) असे त्यांचे नाव आहे. स्फोटाच्या तीव्रतेने ट्रकच्या काचा फुटल्या. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना उपचारास नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह तज्ज्ञांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मिळालेल्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची तपासणी करण्यात येत आहे.
www.konkantoday.com