
आ.सामंतयांच्या प्रचारासाठी युवा सेनेचा मेळावा
जयेश मंगल पार्क येथे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचार्थ युवासेनेचा मेळावा पार पडला.
मेळाव्यात उदय सामंत यांच्या फोटोचा मास्क लावून कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बॅडमिंटन असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आ.उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या.
निवृत्त तहसीलदार हेमंत साळवी व स्वाभिमानच्या कार्यकर्त्या श्रीम.संध्या कोसुंबकर यांनी शिवसेनेत केला प्रवेश.
*आमदार उदय सामंत यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे*
▪मुबंई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्राचे रखडलेले काम पहिल्या ४ महिन्यात पूर्ण करणार.
▪रत्नागिरी युवकांसाठी रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून युवकांना काम देणार.
▪२१ तारखेला विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणार.
▪युवसेनाप्रमुख आदित्यजींच्या नेतृत्वाखाली नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी युवकांनी साथ द्यावी.
▪तरुणांनी देखील राजकाणात यावे व राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा.
▪माझा थेट संपर्क हा गावच्या लोकांसोबत आहे.
▪माझी बदनामी करणाऱ्यांना माझ्या मतदारसंघातील नागरीकांनी मतपेटीतून उत्तर दिल होत.
▪माझा पूर्ण विश्वास हा माझ्या मतदारसंघातील मतदारांवर आहे ते पुन्हा मला भरघोस मताधिक्याने विधानसभेत पाठवतील..
▪हा विजय माझा नसून प्रत्येक मतदारसंघातील मतदाराचा आहे.
या मेळाव्याला सेना भाजपचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com