
सावंतवाडी कुटीर रूग्णालय आवारात १२ फुटी अजगर जेरबंद
सावंतवाडी येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात घुसलेल्या बारा फूट लांबीच्या अजगराला जागृत नागरिकांनी जेरबंद करून वनविभागाच्या कर्मचार्यांच्या ताब्यात दिले. रूग्णालयाच्या रिक्षा स्टँड परिसरात रूग्णांचे नातेवाईक तसेच नागरिकांची कायम वर्दळ असते. आरेकर कॅन्टीन समोरील रूग्णालय गेटसमोर बारा फूट लांबीचा अजगर नागरिकांच्या नजरेस दिसला. आरेकर कॅन्टीनचे मालक तथा माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर, अमित मोरे, सापळे आदी जागृत नागरिकांनी अजगराला जेरबंद केले.
www.konkantoday.com