जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागत आहे. कालपासून जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला रत्नागिरी शहराच्या आजूबाजूच्या परिसरात विशेष संगमेश्वर देवरुख राजापूर विभागात पाऊस पडला राजापूर तालुक्यातील पांढरिनाथ आरेकर यांच्या घरावर वीज कोसळली. देवरुखात विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला.रत्नागिरी शहर परिसरातही आज सकाळपासून पावसाळी वातावरण आहे. सध्या विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात असताना पावसामुळे प्रचारावर परिणाम होत आहे.
www.konkantoday.com