
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे हातभट्टी निर्मिती केंद्रे नष्ट करून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांवर छापा टाकला असून चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, रावळगाव, बोरगांव या गावात दारूच्या हातभट्ट्यांवर छापा घातला तसेच तेथील १० हजार लिटर कच्चे रसायन व तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात एक तीनचाकी रिक्षासह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे .
सदरची कारवाई ही श्रीमती संध्याराणी देशमुख अधिक्षिका राज्य उत्पादन शुल्क यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक शंकर जाधव, शरद जाधव, सुरेश पाटील, दुय्यम निरीक्षक सुनिल सावंत, किरण पाटील, क्षिरसागर, विशाल सकपाळ, राजेंद्र भालेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
www.konkantoday.com