
खासदार तटकरेंच्या बाबतीत माजी खा. अनंत गीते यांचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षात घेण्याची अनेकदा विनंती केली होती. शिवसेना प्रवेशासाठी ते मातोश्रीवर घिरट्या घालीत होते. इतकेच नाही तर एकवेळ मला पक्षात नाही घेतलं तरी चालेल, पण माझी मुलगी अदितीला पक्षात घेऊन उमेदवारी द्या, अशी विनंती सुनिल तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ते भाजपातही जाणार होते पण घोटाळ्याच्या आरोपामुळे त्यांना सेना-भाजपात प्रवेश मिळाला नाही असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला आहे.
www.konkantoday.com