कोणीही कितीही आडवे आले तरी दापोलीवर भगवा फडकवणारच – ना. रामदासभाई कदम
कोणी कितीही प्रकारे अडचणी निर्माण केल्या, आडवे आले तरीही दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवा हा फडकविणारच असा आत्मविश्वास वेळवी येथील सभेत बोलताना पर्यावरणमंत्री ना. रामदासभाई कदम यांनी व्यक्त केला. दापोली मतदारसंघातील शिवसेना-भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार योगेशदादा कदम यांच्या निवडणूक प्रचारार्थ वेळवी येथे रामदासभाई कदम यांची जाहीर सभा झाली.
www.konkantoday.com