
एमआयडीसीमधील मालाला आग लावली अडीच लाखाचे नुकसान
एमआयडीसी येथील कार्यालयात ठेवलेल्या मालाला अज्ञात इसमाने आग लावल्याने त्यामध्ये अडीच लाखांचे सामान जळून खाक झाले. याबाबत फिर्यादी खान यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे .खान यांच्या मालकीचे एमआयडीसीमध्ये गंगा असोसिएट नावाचे कार्यालय त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने वितरकांना विक्रीसाठी ठेवली होती अज्ञात इसमाने या कार्यालयाला आग लावल्यामुळे या आगीत साहित्य जळून भस्मसात झाले साहित्यामध्ये कॉम्प्युटर पैसे मोजण्याची मशिन, सीसीटीव्ही कॅमेरे, आदींचा समावेश आहे .
www.konkantoday.com