आहारात आयोडीनयुक्त मीठ महत्त्वाचे -जिल्हा आरोग्य अधिकारी
आयोडीन युक्त मिठाचा दैनंदिनी वापर करणे किती महत्वाचे आहे तसेच आयोडीनयुक्त मिठाच्या कमतरतेमुळे दररोजच्या जीवनात त्याचे काय परीणाम होतात याबाबत जनजागरण करणार असल्याची माहिती जि.प. रत्नागिरीच्या जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ.बबिता कमलापूरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आरोग्यखात्याकडून घरोघरी जावून मिठाचे नमुने घेवून तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आयोडीनयुक्त मिठात आयोडीनचे प्रमाण किती आहे ते कळणार आहे तर आयोडीनयुक्त न वापरल्यामुळे गलगंड,बहिरेपणा आदी रोगाना सामोरे जावे लागू शकते असेही त्यांनी सांगितले सर्व ग्रामिण भागात आरोग्य यंत्रणा या कामी कार्यरत राहाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या वेळी माध्यम अधिकारी राजेंद्र रेळेकर उपस्थित होते.
www.konkantoday.com