नादुरूस्त एसटी बसेसमुळे कर्मचारी हैराण
विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी राजापूर तालक्यातून दापोली येथे गेलेल्या शिक्षकांना देण्यात आलेली एसटी बस तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत नसल्याने शिक्षकांचे अतोनात हाल झाले होते. त्यामुळे यापुढे चांगल्या स्थितीतील बस देण्यात यावी अशी मागणी राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील लेखी निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण खाडे यांच्याकडे देण्यात आले आहे.
www.konkantoday.com