लाेटेमधील नवीन औद्योगिक वसाहतीला ग्रामस्थांचा विरोध
जागतिक मंदीमुळे लोटेतील कारखानदार आधीच अडचणीत आहेत. नवीन औद्योगिक वसाहतीला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे लोटे एमआयडीसीत सध्या मंदीचे वातावरण आहे. येथे होणारी कोट्यावधींची गुंतवणूक थांबली आहे. या मंदीने हजारो लोकांच्या रोजगाराची संधी घालवली आहे. परशुराम औद्योगिक वसातीमधील बहुतांश कारखाने रासायनिक आहेत. रासायनिक कारखानदारांमुळे अनेक प्रकारचे प्रदूषण होवुन त्याचा स्थानिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या परिसरात नवीन रासायनिक कारखाने नकोत अशी ग्रामस्थांची भूमिका आहे
www.konkantoday.com