भक्षाचा पाठलाग करता करता बिबट्या घुसला वस्तीत
संगमेश्वर तालुक्यात गेले काही दिवस बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे.भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबटय़ा वस्तीत घुसणयाचे प्रकार वाढले आहेत. यातच मंगळवारी सायंकाळी संगमेश्वर गोळवली येथे मांजराचा पाठलाग करताना बिबट्या घराच्या दारापर्यंत आला. बिबट्याला पाहताच घरातील मंडळींनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलात पलायन केले.मात्र यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
www.konkantoday.com