
पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे यंदा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवणार नाही, भूजल विभागाचा अंदाज
जिल्ह्यात पडणार्या मुसळधार पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली त्याचा फायदा भूजल पातळी वाढीसाठी झाला आहे.भूजल विभागाकडून करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ६३ विहिरींच्या सर्वेक्षणात सरासरी अर्धा मीटरने पाणीपातळी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.पाणीपात्रत झालेली वाढ यामुळे यंदा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवणार नाही असा अंदाज भूजल विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
www.konkantoday.com