
दापोली येथे पकडण्यात आलेल्या गांजा मध्ये महिला कनेक्शन
दापोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत दापोली शहरातील कोकंबा आळी परिसरात बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीच्या डिकीतून गांजा जप्त करण्यात आला.या गाडीसह सुमारे ०१ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली पोलिसांना कोकंबा आळी परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मोहन पाटील व दापोली पोलिसांच्या पथकाने काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंचांसमक्ष छापा मारला असता एमएच.०८.आर.४९८० गाडीमधून १४हजार रुपये किमतीचा १ हजार ९६६.५ ग्रॅम वजनाचा छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यात ठेवलेला अमली पदार्थ सदृश्य गांजा या गाडीचे डिक्कीत मिळाला तर संशयित किसन लक्ष्मण कदम यांचेकडे एक हजार रुपये किमतीचा सहा छोट्या पिशव्यांमध्ये ठेवलेला १३५ ग्रॅम गांजा, २ चिलमी,१ लायटर आढळून आला.दापोली पोलिसांनी एकूण २१००.५ ग्रॅम गांजा तसेच १ लाख ७५ हजार रुपये किमतीची चार चाकी जप्त केली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यात रिहाना जमीर काझी (वय ४३ रा. कोकंबा आळी, दापोली) व किसन लक्ष्मण कदम (वय ६५ रा. बेलवाडी पालगड) यांचा समावेश आहे या दोघांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.
www.konkantoday.com