अंध व्यक्तींनी मतदानासाठी पुढे यावे- जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण
अंधांच्या आयुष्यात त्यांना सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांच्या जीवनाची अनुभूती घेऊन आपण साथ द्यावी. या रॅलीचे औचित्य साधून जिल्ह्यातील अंध व्यक्तींनी मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले. जागतिक अंध सहाय्यता दिनी आयोजित फेरीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वतः अनुभूती घेण्यासाठी त्यांनी डोळ्यावर पट्टी व हातात काठी घेवून चालत अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले. जागतिक अंध सहाय्यता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात १०० फुटी ध्वजस्तंभापासून ते सावरकर चौक, गाडीतळापर्यंत स्नेहाज्योती अंध विद्यालय, भराडी-मंडणगड यांच्या विद्यार्थ्यांच्या फेरीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते या रॅलीचे उदघाटन झाले.
www.konkantoday.com