शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याची आज सिंधुदुर्गात कणकवली येथे जाहीर सभा

सिंधुदुर्गात शिवसेनेचे तीनही विधानसभेमध्ये उमेदवार असल्याने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज १६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौर्‍यावर येत आहेत. १६ ऑक्टोबर रोजी दु. ३.३० वा. कणकवली गडनदी पात्रानजिक उमेदवार सतिश सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.तसेच शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीतही ठाकरे सभा घेणार आहेत . विशेषतः राज्यात महायुती असताना कणकवलीत महायुती तुटली असून भाजपा उमेदवाराविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली त्यामुळे कणकवलीतील सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button