
दाभिळ पाझर तलावाचे पाणी चौपदरीकरणाच्या कामासाठी, ग्रामस्थ आक्रमक
खेड जवळील दाभिळ येथील पाझर तलावातील लाखो लिटर पाण्याचा बेकायदेशी उपसा करून हे पाणी चौपदरीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला. य़ा पाणी उपशाला ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी मध्यस्थी करून याप्रकरणी रितसर तक्रार दाखल करावीअसे सांगितले. तसेच सध्या पाण्याचा उपसा थांबवण्यात आला आहे .
www.konkantoday.com