
चिपळूणमध्ये विवाहितेवर तरुणाचा कोयतीने हल्ला
एकतर्फी प्रेम व आर्थिक व्यवहारातून चुकून येथील साैप्राजक्ता नितीन बांद्रे या महिलेवर नितीन तुकाराम तांबिटकर याने कोयतीने वार करून तिला जखमी केले. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी नितीन याला बेदम मारहाण केल्याने तोही जखमी झाला आहे.चिपळूण येथील पेठमाप गणेशवाडी येथील राहणारी विवाहिता प्राजक्ता बांद्रे ही नेहमीप्रमाणे मोहल्ल्यात कामासाठी जात असता शेतावरून आलेल्या नितीन तांबिटकर याने तिला वाटेत अडवले व हातातील कोयत्याने तिच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान या महिलेने हात पुढे करून हा वार रोखण्याचा प्रयत्न केला यामुळे तिच्या बोटांना व हाताला दुखापत झाली या महिलेने तेथून कसाबसा पळ काढत दुसर्यांच्या घरात आसरा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीही तिच्या मागून घरात शिरून त्याने तिच्या पायावर कोयतीने वार केला या प्रकारानंतर तेथे आलेल्या लोकांनी नितीन याला मारहाण केल्याने तो जखमी फ झाला नितीन बरोबर आपले अनेक वर्षांची मैत्री होती परंतु मैत्रीबाबत त्याच्या पत्नीचे व आपल्या पतीचे गैरसमज झाल्याने आपण त्याच्याशी बोलत नव्हतो या रागाने त्याने हल्ला केला असावा असे या महिलेचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com