विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातून सशस्त्र संचलन
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातून आज रत्नागिरी पोलिसांच्यावतीने सशस्त्र संचलन करण्यात आले.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून हे सशस्त्र संचलन करण्यात आले.यावेळी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे तसेच अन्य पोलीस मोठया संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com