
पोलादीमाणसे पुस्तकातून उलगडला उद्योजकांचा संघर्षमय प्रवास
भारतात उद्योजक, निर्यातदार वाढले पाहिजेत. त्याकरिता तरूणांनी उद्योजक बनले पाहिजे. पोलादी माणसे या पुस्तकातून असे काही ज्येष्ठ उद्योजकांचा संघर्षमय प्रवास मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक निश्चितच वाचनीय व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रतिथयश बांधकाम उद्योजक दीपक साळवी यांनी रत्नागिरी येथे
पोलादी माणसे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला या वेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, पोलाद उद्यमिता प्रतिष्ठानचे सुनिल गोयल, लेखक, मुक्त पत्रकार दत्ता जोशी उपस्थित होते. या पुस्तकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २४ उद्योजक व्यक्ती, संस्थांची माहिती आणि त्यांचा संघर्षमय प्रवास मांडण्यात आला आहे.यावेळी
कोकणातील पहिल्या बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, महालक्ष्मी फूड प्रॉडक्टसचे मालक योगेश सरपोतदार आणि कृपा हेअर टॉनिकचे निर्माते राजन दळवी यांची प्रकट मुलाखत दत्ता जोशी यांनी घेतली.
www.konkantoday.com