रत्नागिरी शासकीय रूग्णालयात कोराेनाविरुद्ध आघाडी सांभाळणारे डॉक्टर प्रकाश जांभुळकर आणि त्यांच्या टीमचे कार्य गौरवास्पद

रत्नागिरी जिल्ह्यात कोराेनाचा शिरकाव होऊ नये म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे व त्यांच्या सहकाऱयांनी सुरुवातीपासूनच मोठी मेहनत घेतली होती प्रशासनाने सुरुवातीपासूनच अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी करूनही रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडले त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी रत्नागिरी शासकीय रुग्णालयावर आली रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले या रुग्णालयातून एक रुग्ण बरा हाेऊन गेला तर सध्या येथे चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत रत्नागिरीत जिल्हाशल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी एमडी फिजिशियन असलेले डॉक्टर प्रकाश जांभुळकर व त्यांचे सहकारी यशस्वीरित्या संभाळत आहेत कोरोना झालेला रुग्ण बरा होऊ शकतो हे शासकीय रुग्णालयाने दाखवून दिले आहे सध्या उपचार सुरू असलेल्या काेराेना बाधित रुग्णांची स्थिती चांगली आहे डॉक्टर जांभूळकर हे सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळा रुग्णांची तपासणी करतात रुग्णांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर देण्यापासून इतर मार्गदर्शन करण्याचे कामही डॉक्टर जांभुळकर आणि त्यांची टीम गेले कित्येक दिवस करीत आहे अशा या वैद्यकीय अधिकाऱयांच्या परिश्रमामुळे रत्नागिरी जिल्हा काेराेनाला रोखण्यासाठी यशस्वीरीत्या प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button