चिपळुणातील पोलीस प्रकल्पाचा आज शुभारंभ
चिपळूण शहरात साकारण्यात आलेल्या पोलीस स्थानक व वसाहत प्रकल्पाचा शुभारंभ आज १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. या उदघाटनाला कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांची उपस्थिती लाभणार आहे. सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे साध्या पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे.
पोलीस हौसिंग विभागाने सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून हा नवा प्रकल्प सध्याच्या पॉवरहाऊस येथील बहुउद्देशीय सभागृह परिसरात साकारला आहे. या प्रकल्पात पोलीस स्थानक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सभागृह, पोलीस कॅन्टीन अधिकार्यांसाठी बंगले व पोलीस कर्मचार्यांसाठी ८८ सदनिकांचा समावेश आहे.
www.konkantoday.com