
कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा पुरस्कार
कोकणचे सुपुत्र व प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे नाट्य चित्रपट दूरदर्शन क्षेत्रातील यशस्वी कलावंताला दिला जाणारा कै.के.ना. काळे पुरस्कार जाहीर झाला आहे. ९ नोव्हेंबरला साहित्य संघाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे .राजेश देशपांडे हे राजापूर तालुक्यातील येळवणचे रहिवासी आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट, मालिका यामध्ये भरीव कार्य केले आहे .येळवण येथील शिक्षणतज्ञ चंदुभाई देशपांडे यांचे ते सुपुत्र आहेत.
www.konkantoday
com