हापूस आंब्याच्या जीआय मानांकन नोंदणीला अल्प प्रतिसाद
केंद्र शासनाच्या माध्यमातून हापूस आंब्याला जीआय (भौगोलिक निर्देशांक)मानांकन मिळाले.परंतु हापूसचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी कोकणातील आंबा बागायतदारांकडून नोंदणीसाठी म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे.रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाखहून अधिक आंबा बागायतदार आहेत परंतु जीआय मानांकनासाठी फक्त २५० बागायतदार आणि ६० प्रक्रियादार पुढे आले आहेत.त्यामुळे यासंदर्भात शासनस्तरावरून मानांकन अत्यावश्यक करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. ठाणे ,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील आंब्यासाठी हापूस नावाने जीआय मानांकन गेल्या वर्षी मिळाले होते.
www.konkantoday.com